चारोळी
पडलेली फूले वेचता वेचता
पाने गलायाला लागली
आपली माणसे जोड़ता जोड़ता
परकीच आपली वाटायला लागली
श्रावण
श्रावणाचा खेळ चालला
उन्हा मागे पाउस चालला
मेघांचा रंग दाटला
श्रावणाचा खेळ चालला
गवताच्या हिरव्या गालिच्यावर
हिरवा हिरवा मोर डोलला
श्रावणाचा खेळ चालला
सणाचा रंग उधळला
पानांचा ही रंग बदलला
मित्र मैत्रिनिंचा मेंळ जाहला
श्रावणाचा खेळ चालला
गाणी
मनातली ही गोड गाणी
मंगल गाaणी दंगल गाणी
ओठावर गुण गुणारी सहज गाणी
प्रेमळ आजी ने रचलेली ही बाल गाणी
हसर्या चिमुकल्या पाखरांची गाणी
हत्ती कासव सश्याची गाणी
निरागस चेहह्याच्या त्या तान्ह्यांची गाणी
मंगल गाणी दंगल गाणी
बोबद्या बोलातली गोड गाणी
कधी न विसरणारी ही अमूल्य गाणी
पतंग
आकाशी भरारी मारते पतंग
उंच उडायला शिकाविते पतंग
कागदाचे विविध आकार दर्शविते पतंग
उडवणार्याची मान उंचाविते पतंग
दोर ढीला सोडताच भरकटते पतंग
जिवनाचे हे मुल्य दर्शविते पतंग
उँची गाठता स्थिरवते पतंग
विचारी पुरुषाची खोली सांगते पतंग
नभी जाताच लहानाच्या ओठावर हास्य देते पतंग
मोठ्यानाही लहान करून जाते पतंग
जाळे
मला पाह्ताच ती खुद्कन हसली
मी मनात म्हटले पोरगी जाळ्यात फसली
मी तिला लग्नाची मागणी घालताच ती शरामली
मला काय माहित होते माझीच कुर्हाड माझ्याच पायी बसली
लग्नानंतर सप्तपदिची अनेकदा आठवण येते
सत्यवानाचे काय झाले असेल हा विचार करून त्याची मात्र कीव येते
लग्नाचा लाडू खावून बघावा असे मोठे म्हणतात
त्यांच्या बत्तिशिचे बोळके, डॉक्यावरचे टक्कल बर्याच गोशती सांगून जातात
म्हणून लग्नाचे आमिष कोणाला दाखावू नये
आपण ज्या खद्दयात पडलो त्यात दुस्र्यास पाडू नये
जिद्द
दूबळ्या हाता पायात शक्ति कुठून येते
इवल्याश्या पंखाना एवढी मोठी भारारी कशी मारता येते
प्रयत्न आपल्यापरिने सर्वजण करतात
मग यशाचे शिखर काही मोजकेच का गाठतात
परभावाने कच खावुन काही मागे फिरतात
पराभव ही यशाची पहिली पायरी आहे असे मग लोक का सांगतात
इच्छित मिलाले नाही म्हणून भाग्याला दोष कोणी देतात
तर कोणी आपल्या हक्काचे इच्छित मिळवून घेतात
मनाने ठरवल्यास अशक्य काही नाही
मनात जिद्द असल्यास परमेश्वर ही दूर नाही
नवीन वर्ष
नवीन सालाची चाहुल लागताच मन मोहरून जाते
नवीन स्वप्नांची चाहुल लागताच मन बहरून येते
नवीन सालाच्या स्वप्नात रंगताना मन गहिवरून येते
हेच नवीन वर्ष दर वेळी नवीन बनून येते
निसर्ग
निसर्ग आपल्याला नेहमीच काहीतरी सांगत असतो
आयुष्य कसे जगावे हे आपल्याला नेहमीच शिकवित असतो
डोळे उघडे ठेवून आपण बघितले तर आपणास कलेल
आपण त्याच्याकडून किती आत्मसात करू शकतो
सूर्य प्रकाश देतांना, नदी पाणी देतांना, वारा शीतलता देतांना विचार करीत नाही
मग गरिबाला एक रूपया देतांना आपले मन आपणास का मागे खेचते ?
रुतु मागुन रुतु बदलतात तरी निसर्ग कधी तक्रार करतांना दिसत नाही
मग छोटीशी गोष्ट मनाविरुद्ध झाली की आपली का तगमग होते?
निसर्गाला सगलेच सारखे असतात
मग आपणच का आपल्यात भेदभाव करतो ?
डोळ्या समोरचा गुरु आपणास दिसत नाही
म्हणुनच नाही का आपण सदैव भटकत असतो ?
दिशा
कुठे चाललाय माणुस, का इतका बदललाय
पुढे जाता जाता बालपणीच्या सवंगड़यालाच विसरलाय
कधी विचार केलात असे का घडतय?
सर्व सूखे असुनही जीवन का कुढतय ?
उत्तर शोधण्याचा प्रयत्न माणुस नेहमी बाहेरच करत असतो
उत्तर सापडणार नाही हे त्यालाही माहिती नसतं
मग, तरीही का..
तरीही का स्वतःला एवढं पुढे न्यायचं की छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणी मोठ्या सुखाच्या अनुपस्थितिने दुखी व्हायचं ?
कुठे नेणार आपल्याला हे आपले विचार आणि ही विचारसरणी
फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या चिमुकल्या साथीदारांना...
आपल्यालाच कळत नाही आपण कुठे जातोय
तर त्यांना कसा मार्ग दाखवणार ?
चला आपण एक छोटासा प्रयत्न करू, आपण स्वतःशीच प्रामाणिक राहू
आणि एकमेकांना जोडून आपलेसे करू !
विचार कर
अरे मानवा विचार कर
इथे का आला आहेस ह्याचा विचार कर
इथे काय करतो आहेस ह्याचा विचार कर
पैसा की प्रेम काय मोठे आहे ह्याचा विचार कर
सुख की समाधान काय हवे आहे ह्याचा विचार कर
आपली माणसे की एकांत काय हवेसे वाटते ह्याचा विचार कर
भक्ति की चैन कोण बरोबर मार्ग दाखवते ह्याचा विचार कर
मानवा एक क्षण कधी तरी विसावा घे आणि विचार कर