मराठीमाणूस.नेट ! Marathimanus.net !

मराठी आमची मायबोली ! मराठी मन जोड़णारी !
मुख्य पान
भारत माझा देश
राष्ट्रगीत
ओळखीचे चेहरे
आध्यात्मिक
गजानन महाराज
संस्कार
मारुति
गणपति
लेखणीतून
मराठी साइट्स
आरोग्य
मराठी गाणी (विडियो)
किलबिल
बाल रंजन
सम्पर्क करा
मराठी चित्रपट
 

 

 

 

 
बजरंगबली की जय
लहान मुलांनी मारुति स्तोत्राचे पठन करावे त्याने उच्चार स्पष्ट होण्यास मदत होते. तसेच मारुतिस्तोत्र भितीनाशक समजल्या गेले आहे.

 मारुतिस्तोत्र 

 
भिमरुपी महारुद्रा वज्रहनुमान मारुति |
वानरी अंजनी सुता रामदुता प्रभंजना ||१||
महाबली प्राणदाता सकला उठ्वी बले
सौख्याकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका ||२||
दीनानाथा हरिरुपा सुंदरा जगदनतरा |
पातालदेवताहन्ता भव्यसिंदुर लेपना ||३||
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोशिका ||४||
ध्वजाग्रे उचली बाहो आवेशे लोटला पुढे |
कालाग्नि कालरुद्राग्नी देखता कापती भये ||५||
ब्र्हमांडे मायेली नेणों आवले दंत पंगति
नेत्राग्नि चालिल्या ज्वाला भृकुटी ताठील्या बले ||६||
पुच्छ ते मुरडिले माथा किरीटी कुण्डले बरी |
सुवर्ण कटी कासोटि घंटा किनिकिनी नागरा ||७||
ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातलू |
चपलांग पाहता मोठे महाविद्युल्ल्तेपरी ||८||
कोटीच्या कोटी उद्दाने झेपावे उत्तरेकडे |
मन्द्राद्री सारखा द्रोणु कोधे उत्पाटिला बले ||९||
आणिला मागुती नेला आला गेला मनोगति |
मानसी टाकीले मागे गतिसी तुलना नसे ||१०||
अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे |
तयासी तुलना कोठे मेरु मंदार धाकुटे ||११||
ब्रम्हांडाभोवते वेढे वज्रपुच्छे करू शके |
तयासी तुलना कैची ब्रह्मान्डी पाहता नसे||१२||
आरक्त देखिले डोळा ग्रासिले सुर्यमंडला |
वाढता वाढता वाढे भेदिले शुय्नमंडला ||१३||
धन धान्य पशु वृद्धि पुत्र पौत्र समस्तही |
पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठे करुनिया ||१४||
भूतप्रेतसमंधादी रोगव्याधि समस्तही |
नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने ||१५||
हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभाली बरी |
दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकला गुणे ||१६||
रामदासी अग्रगणु कपिकुलासी मंडणू |
रामरुपी अंतरात्मा दर्शने दोष नासती ||१७||
इति श्री रामदासकृतसंकटनिरसन मारुति स्तोत्र सम्पुर्नम ||